१. पहिला टप्पा (८ ते १५ जानेवारी): या कालावधीत ज्या शेतकऱ्यांचा २५% अग्रिम (pik vima Advance) पीक विमा मंजूर झाला आहे, त्यांच्या खात्यात उर्वरित ७५% रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. २. दुसरा टप्पा (२० जानेवारीपासून): ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीचे क्लेम केले होते आणि ज्यांचे पंचनामे पूर्ण होऊन विम्यास पात्र ठरले आहेत, अशा उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २० जानेवारीपासून थेट रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे.
विमा वितरणाची वैशिष्ट्ये
- थेट लाभ हस्तांतरण (DBT): सर्व विम्याची रक्कम ‘आधार लिंक’ असलेल्या बँक खात्यातच जमा केली जाईल.
- हेक्टरी परतावा: नुकसानीच्या तीव्रतेनुसार, सोयाबीनसाठी १५,००० ते १७,५०० रुपये आणि कापसासाठी १८,००० रुपयांपर्यंत हेक्टरी मदत मिळण्याची शक्यता आहे.
- पात्र जिल्हे: बीड, लातूर, धाराशिव, बुलढाणा, अकोला आणि अमरावती यांसारख्या अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या टप्प्यात प्राधान्य दिले जाणार आहे.
तुमची स्थिती (Status) कशी तपासायची?
तुमचा विमा २० तारखेच्या यादीत आहे का, हे पाहण्यासाठी: १. PMFBY पोर्टल: pmfby.gov.in वर जाऊन ‘Application Status’ तपासा. २. बँक ई-केवायसी: तुमचे बँक खाते ‘NPCI’ मॅपिंगसह आधारशी लिंक असल्याची खात्री करा, अन्यथा तांत्रिक कारणास्तव २० तारखेला मिळणारे पैसे थांबू शकतात.
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण: ग्राहकांसाठी दागिने खरेदीची सुवर्णसंधी Gold Price Today